फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय आणि त्याचा उपयोग सामान्य लोकांसाठी
आजच्या आधुनिक युगात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. न्यायालयाला खरी माहिती मिळवून देण्यासाठी आणि सत्य सिद्ध करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स महत्त्वाची भूमिका बजावते. फॉरेन्सिक सायन्स म्हणजे फक्त पोलिस किंवा कोर्टापुरते मर्यादित नसून ते सामान्य लोकांनाही खूप उपयोगी ठरते.
फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय ?
फॉरेन्सिक सायन्स म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारी तपासामध्ये पुराव्यांचे विश्लेषण करणे.
यामध्ये विविध शाखा आहेत:
- फिंगरप्रिंट तपासणी
- सही व हस्ताक्षर पडताळणी
- डीएनए तपासणी
- डिजिटल पुरावे (CCTV, ऑडिओ, व्हिडिओ) आग व अपघात तपासणी

फॉरेन्सिक सायन्सची सुरुवात कशी झाली ?
फॉरेन्सिक सायन्सचा इतिहास प्राचीन काळापासून आहे. जगभरात पुरावे तपासण्यासाठी विज्ञानाचा वापर सुरू झाला.
1897 मध्ये भारतात हेन्री फिंगरप्रिंट सिस्टम सुरू करण्यात आला आणि भारत हा फिंगरप्रिंट प्रणाली लागू करणारा पहिला देश ठरला. त्यानंतर डीएनए, डिजिटल तपास, आधुनिक प्रयोगशाळा यांचा समावेश झाला.
फॉरेन्सिक सायन्स सामान्य लोकांसाठी कसा उपयोगी पडतो ?
फॉरेन्सिक सायन्स फक्त गुन्हेगारी प्रकरणापुरते मर्यादित नाही तर सामान्य लोकांसाठीही उपयुक्त आहे:
- बँक व इन्शुरन्स फसवणूक प्रकरणे सोडवण्यासाठी.
- सही व हँडरायटिंग पडताळणी करून खोटी कागदपत्रे उघड करण्यासाठी.
- डिजिटल पुरावे (CCTV, मोबाईल, ई-मेल, ऑडिओ-व्हिडिओ) तपासण्यासाठी.
- आग, अपघात किंवा मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठी.
- कोर्टात पुरावे सादर करून सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी.
फॉरेन्सिक सायन्सचे महत्त्व
- सत्य शोधणे व न्यायालयात सादर करणे.
- निरपराध व्यक्तींचे रक्षण करणे.
- गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणे.
- समाजात सुरक्षितता व विश्वास टिकवणे.
फॉरेन्सिक सायन्स हे फक्त टीव्हीवरील “CSI” मालिकेपुरते नाही, तर ते आपल्या दैनंदिन जीवनातील सत्य शोधण्याचे आणि न्याय मिळवून देण्याचे एक प्रभावी साधन आहे. सामान्य लोकांसाठी फॉरेन्सिक तपासणी ही फसवणुकीपासून वाचण्यासाठी आणि योग्य न्याय मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त सेवा आहे.

सामान्य प्रश्न
प्रश्न: फॉरेन्सिक तपासणी सामान्य माणूस करू शकतो का?
👉 होय, कोणत्याही व्यक्तीला संशयास्पद कागदपत्रे किंवा पुरावे तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेशी संपर्क करता येतो.
प्रश्न: फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात ग्राह्य धरला जातो का?
👉 होय, ISO प्रमाणित व न्यायालय मान्यताप्राप्त फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.
प्रश्न: याची किंमत कशी असते?
👉 केसच्या प्रकारानुसार व तपासणीच्या स्वरूपानुसार शुल्क ठरवले जाते.
THANK YOU
DRUSHTI FORENSIC LAB, KOLHAPUR.
MOB NO:- 9552912971
